Fish Farming मत्स्यपालन व्यवसाय

नमस्कार मित्रांनो आपण नेहमी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाविषयी माहिती घेत असतो. आज आपण आशाच एका शेतीपूरक फायदेशीर व्यवसाय बद्दल माहिती घेणार आहोत Fish Farming .

मत्स्य शेती म्हणजे कृत्रिम पद्धतीने माशांची पैदास करणे. सगळेजण मत्स्य शेती करू शकत नाही. हा प्रामुख्याने खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे. मच्छिमार लोक परंपरेने हा व्यवसाय करत आलेले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात गोड्या पाण्यातील माशांची वाढती मागणी लक्षात घेता. आता कृत्रिम पद्धतीने तलाव तयार करून त्यामध्ये मत्स्यबीज सोडून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.
तरीही आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये याविषयी पाहिजे तेवढी जागृकता नाहीये. आपण जर मत्स्यशेती कडे सुधारित शेती पूरक उद्योग म्हणून बघितलं, मत्स्यव्यवसायाला एका नवीन पद्धतीने करून जर उत्पादन वाढलं तर नक्कीच आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाडीमध्ये मोलाचा हातभार लावू शकतो.

शेताला पाणीपुरवठा मनाप्रमाणे करता यावा यासाठी शेततळ्यामध्ये पाणी साठवले जाते. या शेततळ्यामध्ये जर माशांची अंडी सोडली तर जेवढा काळ आपण पाणी साठवणार अहोत तेवढा या काळामध्ये आपल्याला माशांचे उत्पादन घेता येते.

मत्स्य शेती हा व्यवसाय हळूहळू भारतातील सर्व राज्यांमध्ये केला जात आहे. कमी वेळेमध्ये जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय नावारूपास येत आहे. मत्स्यशेतीचा समावेश हा किसान क्रेडिट कार्डाच्या योजनांमध्ये ही सरकारने केलेला आहे.

मत्स्य शेतीसाठी Fish Farming कर्ज योजना

 • मत्स्यशेतीच्या विकासासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून भरीव मदत करणार आहे.
 • अनुदान रुपात सहकार कमीत कमी एकूण खर्चाच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम पुरवणार आहे.साठवलेल्या पाण्यात मासेमारी आणि वाहत्या पाण्यात मासेमारी या दोन्ही योजनेसाठी सरकार मदत करणार आहे.

कसा सुरु करा कराल मत्स्यशेतीचा Fish Farming प्रकल्प ?

जर तुम्हाला व्यापारी मासेमारीसाठी मच्छ शेती करायची असेल तर तुम्हाला पूर्ण प्रकल्प खर्च २० लाखापर्यंत येऊ शकतो. या २० लाखा मधले 5 लाख रुपये तुम्हाला स्वतः उभे करावे लागतील. तर 15 लाख रुपये सबसिडीच्या रूपामध्ये सरकार देऊ शकते.

 • माशाच्या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडल्यानंतर कमीत कमी 25 दिवसांमध्ये ते पूर्ण विक्रीयोग्य तयार होतात.
 • मत्स्य शेतीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
 • मत्स्य शेती सुरू करण्यासाठी तलाव तुमच्या मालकीचा असावा.
 • तलावाचे बांधकाम हे उच्च दर्जाचे असावे, तलावांमध्ये पाण्याचा साठा झाल्यानंतर यामधील पाण्याचे परीक्षण करून घ्यावे.
 • मत्स्यशेतीसाठी माशाच्या प्रजातींची निवड करताना मजबूत शरीर यष्टी भक्कम आणि घट्ट शरीराचा सामान्य रोगमुक्त आणि निरुपद्रवी असावा.
 • असे मासे हे जलद वाढीचा दर असणारे असतात, त्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि सुपीकता साठवली जाते.
 • साठवण्यापूर्वी माशांच्या प्रजाती निर्जंतुक केल्या पाहिजे, जंतूनाशक होण्यासाठी १५ टक्के मिठाच्या पाण्यात मासे मिसळावे.
 • मत्स्यपालना मध्ये जलीय प्राण्यांचे खाद्य हे त्यांच्या वागणुकीने नुसार किंवा प्रजातींच्या पॅरामीटर्स नुसार निर्धारीत केले जातात.
 • मत्स्यपालनाचे गुणोत्तर आणि खाद्य यांचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीतून आहार द्यावा.

मत्स्यपालनाचे फायदे

 • तांत्रिक प्रगतीमुळे शेततळे, तलावांमध्ये राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे ६०० किलोग्रॅम प्रति हेक्‍टर वरून २००० किलोग्रॅम प्रति हेक्‍टर वर पोहोचली आहे.
 • मत्स्यशेती मुळे जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा मदत होते.
 • अल्पभूधारक आणि भूमिहीन मजुरांसाठी फारच लाभदायक उद्योग आहे.
 • मत्स्य शेती मध्ये आपण जेवढे पैशांची गुंतवणूक करु त्याच्या तिप्पट नफा आपण कमवू शकतो.
 • आपल्या कामावर,मार्केटिंग आणि मासा ची देखभाल करण्यावर नफा अवलंबून आहे.
 • भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे आणि परदेशात सुद्धा या माशांची खूप मागणी आहे.
 • सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि प्रशिक्षण त्यामुळे हा व्यवसाय करणे फारच सोपे झाले आहे.

मत्स्य शेती साठी योजना

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने म्हटले आहे, की केंद्र सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रात २५ हजार कोटी पर्यंतची गुंतवणूक योजना आखत आहे. समुद्री क्षेत्रांमध्ये उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि छोट्या मच्छीमारांना भेडसावत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने जसा योजना आखल्या आहेत. त्या अंतर्गत सरकार शेततळ्यातील मत्स्य शेतीसाठी ही प्रोत्साहनपर योजना राबवणार आहे.

या योजनेअंतर्गत पाच वर्षात अतिरिक्त ७० लाख टन मासे तयार केले जाते. यामुळे माशांची परदेशातील निर्यात दुप्पट होऊन १ लाख कोटी रुपये इतकी होईल.

मत्स्यशेतीसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कार्प व कॉमन कोर्ट जातीच्या माशांचे दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यांमध्ये मत्स्यबीज उत्पादन केंद्रे स्थापन केली गेली आहेत. या केंद्रातून अगदी नाममात्र दराने मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाते.

मासळी सुरक्षित राहण्यासाठी बर्फात अथवा शीतगृहात ठेवणे आवश्यक असते. बर्फी कारखाने आणि शीत गृह हे सहकारी क्षेत्रात येत असल्याने सहकारी संस्थांना प्रत्येक वीज युनिट वर ४० पैसे सूट देण्यात येणार आहे.

मत्स्यशेती मध्ये असणाऱ्या सर्व सहकारी संस्थांच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी, आर्थिक मजबुती देण्यासाठी सहकारी संस्थांना व्यवस्थापकीय सबसिडी आणि भांडवली मदत देण्यात येत आहे.

मासेमारीसाठी लागणारी जाळी आणि सूत सर्व मच्छिमारांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या सभासदांना अनुदान देण्यात येते.

गोड्या पाण्यातील निवडक मासेमारी क्षेत्रांना वाढवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून मत्स्य संवर्धनाच्या बाबतीत प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. तसेच मत्स्य शेती मिळालेल्या उच्च प्रतीच्या माशांच्या विक्री संबंधी च्या बाजारात समन्वय आणणे. या उद्देशाने जिल्ह्यामध्ये मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणेची स्थापना करण्यात आलेली आहे. या यंत्रणेची अध्यक्ष हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सदस्य म्हणून जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त असतात.

अधिक माहितीसाठी आपण संचालक महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्याशी संपर्क साधू शकता.

Leave a Reply