शेवाळ शेती spirulina farming (blue-green algae) स्पिरुलिना

spirulina farming आधुनिक शेतीचा आविष्कार मिळवून देणार भरपूर फायदा - शेवाळ शेती blue green algae, स्पिरुलिना blue green algae
spirulina farming

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेत असतो. आज आपण अशाच एका शेतीपूरक व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत तो व्यवसाय आहे शेवाळ शेती spirulina farming. आधुनिक काळामध्ये पारंपारिक शेतीपेक्षा अपारंपारिक रीतीने नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञान लागू करून आधुनिक शेतकरी जास्त कमाई मिळवून देणाऱ्या व्यवसाय करत आहे, या व्यवसायातला एक भाग म्हणजे शेवाळ (blue-green algae) शेती.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे असलेला कल लक्षात घेता शेतीपूरक व्यवसायाची गरज फारच वाढली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. आपण आमच्या मागच्या लेखांमध्ये पॉलीहाऊस, शेततळे, तेलाचा घाणा, कुकुट पालन व शेळीपालन असे शेतीपूरक व्यवसाय जाणून घेतले आहेत. अशाच प्रकारे आपल्या हया लेखांमध्ये आपण शेवाळ शेती विषयी जाणून घेत आहोत.
शेवाळाची लागवड करून त्यापासून चांगलं उत्पन्न मिळवणे. ही शेती पारंपारिक शेती पेक्षा वेगळी आहे. यासाठी कुठलीही जमिनीची गरज नाही. आपण छोट्याशा हौदामध्ये किंवा छोट्याशा पान तलावांमध्ये शेवाळाची लागवड करून पिक घेऊ शकता. शेवाळ शेती मध्ये प्रामुख्याने स्पिरुलिनाची लागवड केली जाते. स्पिरुलिना एक आधुनिक शेवाळवर्गीय जातीची पौष्टीक औषधी वनस्पती आहे.

काही काळापूर्वी आयुर्वेदिक कंपनी पतंजलीने जेव्हा स्पिरुलिनाची टॅबलेट काढली तेव्हा लोकांना या विषयी अधिक माहिती मिळाली.

स्पिरुलिना लागवडीसाठी महत्त्वाच्या गोष्टी

 • स्पिरुलिना(Spirulina) लागवडीसाठी आपल्याला १५ डिग्री सेल्सिअस ते ४५ डिग्री सेल्सिअस तापमान ठेवावे लागते आणि पाण्याचा पीएच(pH) ९ पेक्षा जास्त नसावा.
 • तुम्ही छोटे-छोटे हजार लिटरचे हाउद बनवून यामध्ये ९ पीएच पेक्षा कमी पाणी वापरून शेवाळ blue-green algae बीज सोडू शकता.
 • तुम्हाला हौदसाठी पैसे खर्च करायचे नसल्यास तुम्ही स्वस्तात काम म्हणून खड्डे खोदून त्यामध्ये प्लास्टिक टाकून त्याला हवा तसा तो वापरू शकता.
 • प्रति हजार लिटर पाण्यामध्ये एक किलो शेवाळ बीज सोडले जाते, त्यानंतर पाणी ढवळण्यासाठी यामध्ये एक डीसी मोटर बसवली जाते. सुमारे ३० ते ४५ दिवसात  शेवाळाची पूर्णपणे वाढ होते आणि त्यानंतर आपण शेवाळाची काढणी करू शकता.
 • ५०० मायक्रोन ची जाळी वापरून पाणी पूर्णपणे काढून टाकले जाते त्यानंतर मिळालेले स्पिरुलिना वाळवले जातात.
 • पुढे जाऊन आपण हे स्पिरुलिना डायरेक्ट विकू शकता किंवा त्याची पावडर करून त्यापासून टॅबलेट(Tablet) बनवून विकू शकता.
 • स्पिरुलिना शेवाळाची टॅबलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम शेवाळ कोरडे करून घ्या आणि त्यानंतर हाताने लाटून पेना सारखा पातळ थर तयार करा; नंतर छोटे छोटे टॅबलेट सारखे तुकडे करा. नंतर आपण या तयार टॅबलेट विक्रीसाठी पॅक करू शकता.

किती होईल एका एकरात कमाई?

स्पिरुलिनाचे एका एकरात दररोज ३२ किलोचे उत्पादन घेता येते. स्पिरुलिना ८०० रुपये प्रति किलो दराने विकले जाते, त्यानुसार एका दिवसांमध्ये आपण २५००० ते ३०००० रुपये पर्यंत नफा कमवू शकता.

शेवाळ (स्पिरुलिना) चे फायदे :

 • शेवाळ प्रतिकारशक्ती वाढवत करत असल्याने याचा वापर आहारामध्ये जास्त केला जातोय.  शेवाळ हे पशू आहार म्हणून सुद्धा वापरले जाते.
 • शेवाळापासून बायोडिझेल बनवण्याचे तंत्रज्ञानही आता विकसित झाले आहे
 • स्पिरुलिना शेवाळाची लागवड  करण्यासाठी जवळपास साडे चार लाख रुपये प्राथमिक भांडवल लागते आणि सरकार यासाठी ५० टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देते.

स्पिरुलिना लागवडीसाठी भारत सरकारच्या MSME मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशिक्षण देणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पिरुलिनाच्या टॅबलेटला शक्तिवर्धक सप्लिमेंट(dietary supplement) म्हणून फार मोठी मागणी आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जर सर्व शेतकऱ्यांनी स्पिरुलिनाचे प्रकल्प सुरू केले तर त्यांना पारंपरिक शेतीतून होणारे नुकसान भरून काढण्याशिवाय आपली आर्थिक उन्नती करून घेणे साध्य होणार आहे.

1 Trackback / Pingback

 1. फुलांची शेती Flower Farm करून मिळवा लाखोंच उत्पादन -

Leave a Reply