Poultry Farming कुक्कुटपालन अनुदान योजना 2023, नमस्कार वाचकांनो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नेहमीच नवनवीन सरकारी योजना, तसेच शेतीपूरक व्यवसाय विषयी माहिती घेत असतो. आज आपण अश्याच एका शेती पूरक व्यवसाय विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
शेतीला पूरक असा एक व्यवसाय आहे, कुकूटपालन Poultry Farming म्हणजेच कोंबड्या पाळणे. शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत सरकारने कुक्कुटपालन संबंधित महत्त्वाच्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंडी आणि कोंबड्यांची मागणी बाजारात सतत वाढत आहे. मागणीच्या संदर्भात पुरवठा कमी असल्यामुळे अंडी आणि कोंबड्यांची अनावश्यक भाववाढ होत असते. याच मागणीला लक्षात घेता कोंबडीपालन देखील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून उदयास आलेला आहे. हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी कुक्कुटपालन योजना २०२३ सुरू केली होती त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना कोंबडीपालनासाठी प्रोत्साहित केलं जात होतं, या योजनेशी संबंधित माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कोंबडी पालनासाठी लागणारे भांडवल,त्यासाठीची प्रक्रिया आणि इतर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने कुकूटपालन योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत राज्यात नवीन पोल्ट्री फार्म ची स्थापना केली जात आहे. या योजनेसाठी लागणारे सर्व अर्थसहाय्य सरकारतर्फे उपलब्ध करून दिल्या जाते. तसेच या कोंबडी पालन योजनेसाठी भारतात नाबार्डने पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.
राज्यातील बेरोजगारीचा दर लक्षात घेता शेती पूरक व्यवसायाला चालना देणे एक काळाची गरज बनले आहे. याच अनुषंगाने सरकार कोंबडीपालनासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवत आहे. या योजनेमुळे महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी करता येईल. या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
कुक्कुटपालन योजना Poultry Farming २०२३ चे फायदे
पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याजदराने कर्ज मिळते.
यामुळे केवळ बेरोजगारांना रोजगारच मिळाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्नासाठी हि हातभार लागला आहे. भारतात सुमारे 300 दशलक्ष शेतकरी आहेत जे कुकुट पालन योजना करतात आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा बराच हातभार लावतात.
कुकुट पालन हा उत्पन्ना चांगला स्रोत आहे .
कुकुट पालन व्यवसायात पाण्याची फारच कमी गरज आहे.
त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकते आणि विदर्भ सारख्या दुष्काळी आणि पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या भागांमध्ये हा व्यवसाय वरदान ठरू शकतो.
कुक्कुटपालन व्यवसायात अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो आणि हा व्यवसाय बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे.
पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालनासाठी कुठल्याही प्रकारचा परवाना आवश्यक नाही आणि कुकूटपालन एकदा सुरू केल्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक देखरेख आवश्यक नसते.
सर्वांना ठाऊक आहे की मांस मिळवण्यासाठी बॉयलर कोंबड्या पाळल्या जातात तर अंडी देण्याच्या उद्देशाने लेअर्स कोंबड्या पाळल्या जातात.
Poultry Farming कुकुट पालन योजने साठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्डची प्रत
- कायमचा रहिवासी पुरावा
- मतदार ओळख पत्र इलेक्शन कार्ड
- प्रकल्प उभारायच्या जागेच्या जमिनीची नोंद किंवा सातबारा उतारा बँकेचा तपशील
- प्रकल्प अहवाल
Poultry Farming योजनेची पात्रता
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी फक्त अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि बचत गट ही या योजने अंतर्गत अर्ज करू शकता
- हा व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तीने या व्यवसाय संबंधीच्या अनुभव किंवा प्रशिक्षण संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या जमिनी विषयीची कागदपत्रे ही आवश्यक आहेत.
कुक्कुटपालन Poultry Farming योजने अंतर्गत मिळणारे लाभ
- कुकुट पालनासाठी शासनाकडून 25 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते
- अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 35 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
कुकूटपालन Poultry Farming योजनेसाठी एसबीआय बँके कर्ज पद्धती
- एसबीआय कुक्कुटपालनासाठी कर्ज देते यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून मिळालेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- ज्या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू करू इच्छिता त्या ठिकाणी बँक अधिकारी भेट देतील.
- यानंतर प्रत्यक्ष पाहणी आणि सदरील अहवाल यानंतर बँक आपले कर्ज मंजूर करील.
- आपल्या प्रत्यक्ष गुंतवणुकीवर बँक 75 टक्क्यांपर्यंत कर्ज आपल्याला दिले जाईल.
- एसबीआय बँक आपल्याला नऊ लाखापर्यंत कर्ज देऊ शकेल परंतु ते कर्ज तुम्हाला पाच वर्षाच्या बंधनकारक कालावधीत परत करावे लागे.