Silk Farming(Sericulture) रेशीम शेती

ह्या लेखामध्ये रेशीम उद्योगाविषयी (Sericulture) माहिती देणार आहोत.

शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखाच आणखी एक शेती पूरक व्यवसाय म्हणजे रेशीम उद्योग (silk Farming/Reshim udyog). पारंपारिक शेती कडे बघता आपल्या मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाविषयी तसं जास्त फारसं ज्ञान नाहीये. उत्तर भारतातल्या शेतकर्‍यांकडे बघून आता रेशीम उद्योगाकडे आपला कल वाढत आहे.

रेशीम उद्योगासाठी (silk Farming/Reshim udyog) कुठल्याही प्रकारचं पाणी लागत नाही. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भ सारख्या भागांमध्ये रेशीम उद्योग चांगल्या प्रकारे चालवता येऊ शकतो. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चामध्ये व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्य साहित्यातुन सुरू करता येतो.

रेशीम उद्योगासाठी (silk Farming/Reshim udyog) लागणारा मुख्य कच्चामाल म्हणजे तुतीच्या झाडाची लागवड आणि रेशीम किड्यांचं संगोपन. यासाठी कुठल्याही अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ही आपण हा व्यवसाय व्यवस्थितपणे चालवू शकतो. या व्यवसायाच्या बाजाराकडे बघता शासनाने रेशीम उद्योगासाठी कच्चा माल खरेदीची निश्चित दराची हमी दिलेली आहे.

तुतीच्या झाडांची लागवड दरवर्षी करावी लागत नाही, एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत ते झाड जिवंत राहू शकते. त्या शिवाय तुतीच्या झाडाला पाण्याची उपलब्धता फार कमी लागते. पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्याला देखील हा व्यवसाय करणे फारच सोपे आहे. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारखे शेती पूरक व्यवसाय ,ऊस, द्राक्ष आणि नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय व्यवस्थित या करता येईल.

कस कराल नियोजन

पट्टा पद्धतीने शेतीची आंतरमशागत मजुराने ऐवजी अवजाराने आणि यांत्रिक पद्धतीने कमी खर्चात, वेळेवर करून घेता येते. यामुळे मजुरी मध्ये बरीच बचत होते. तुतीच्या रोपाला कोणत्याही प्रकारचा रोग प्रादुर्भाव होत नाही यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाचतो.

रेशीम अळ्यांचे एकूण २८ दिवसांचे आयुष्यमान असते, त्या पैकी २४ दिवसातच त्यांना तुतीच्या पाल्यांचे खाद्य दयावे लागते. या २४ दिवसांपैकी सुरुवातीचे १० दिवस शासनामार्फत वाजवी दराने कीटक दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यास अवघ्या १४ दिवसात कोष उत्पादनाचे पीक घेता येते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, पैसा वाचतो तसेच उत्पादनात २५% वाढ होऊ शकते.

शेतीमध्ये रेशीम कोषाशिवाय १४ दिवसात उत्पन्न देणारे कुठलेही नगदी स्वरूपाचे पीक अस्तित्वात नाही. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी शिवाय या उद्योगातून दरमहा उत्पन्न मिळवता येते. इतर शेती पिकांप्रमाणे यामध्ये फारसं नुकसान होत नाही. शासनाने ठीक-ठिकाणी कोष खरेदी केंद्र स्थापन केली आहे, ही कोष खरेदी कधी शास्त्रीय पद्धतीने होत असून त्याचा दर ६५ रुपये ते १३० रुपये प्रति किलो आहे.

रेशीम उद्योगातून(silk Farming/Reshim udyog) मिळणारे इतर फायदे

  • अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येते.
  • वाळलेला पाला व विष्ठेचा उपयोग गोबरगॅस मध्ये करता येतो.
  • तुतीच्या वाळलेल्या पानांचा इंधन म्हणून वापर करता येतो, तसेच खत म्हणून सुद्धा वापर करता येतो.
  • संगोपनामध्ये पाळलेल्या अळ्यांचा चोथ्या पासून गांडूळ खत तयार करता येते.
  • तुती रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळू शकते कारण रेशिमाची मागणी भारतापेक्षा पाश्चात देशांमध्ये अधिक आहे.
  • तुतीच्या पानांमध्ये अ जीवनसत्त्वाच प्रमाण आढळतं, त्यामुळे तुतीचा पाला आणि रेशीम कोष आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • तुतीचे कोष शासनामार्फत खरेदी केले जात असल्याने एकरी ३५०० ते ४५०० अतिरिक्त उत्पन्न दरवर्षी मिळू शकते.

Leave a Reply