ठिबक सिंचन (Drip irrigation) – ड्रीप इरिगेशन

ठिबक सिंचन (Drip irrigation) म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. प्रत्येक ठिबक मोजून-मापून, पाणी, पोषक तत्व आणि अन्‍य वृद्धिसाठी आवश्यक गोष्टींप्रमाणे विधिपूर्वक नियंत्रित एक समान निर्धारित मात्रेत पाणी सरळ झाडाच्या मुळाशी पोहोचवले जाते.

सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन (Drip irrigation) एकट्या महाराष्ट्रात केले जाते. महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचन Drip irrigation योजना, तुषार सिंचन sprinkler irrigation योजना करिता आता सरसकट 80 टक्क्यांपर्यंत जास्तीत-जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी अनेक बैठका घेत ठिबक सिंचनासाठी जास्त अनुदान मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता आणि आर्थिक भरीव तरतूद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 70 ते 80 टक्के पर्यंत जास्तीत जास्त अनुदान देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केलेला आहे आणि हा निर्णय खरं तर स्वागत करण्याजोगा आहेच.

ठिबक सिंचन (Drip irrigation) – ड्रीप इरिगेशन

केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे सध्या अल्प व अत्यल्प जमीन धारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी मिळणारे अनुदान त्या शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाच्या 55 टक्के व बाकीच्या शेतकऱ्यांना 45 टक्के दिले जाते. त्या अनुदानात केंद्र सरकारचा 60 टक्के व राज्य सरकारचा 40 टक्के वाटा असतो परंतु 45 ते 55 टक्के पर्यंत दिले जाणारे अनुदान फारच कमी होते, त्यानंतर राज्य शासनाने २०१७ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना लागू केली व अनुदान वाढवले होते.

ठिबक सिंचन (Drip irrigation) योजना 2021-22 पात्रता

 • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
 • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.
 • शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
 • जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
 • शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
 • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
 • शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.

कृषी सिंचन (irrigation) योजना 2022 ची कागदपत्रे

 1. पूर्वसंमती पत्र
 2. शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे
 3. वीज बिल
 4. बँक खाते पासबुक
 5. पासपोर्ट आकार फोटो
 6. खरेदी केलेल्या संचाचे बिल आधार कार्ड
 7. ओळखपत्र
 8. मोबाईल नंबर

ठिबक सिंचन (Drip irrigation) शासन निर्णय-2022

सन 2021-22 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना करता रुपये 200 कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महाडीबीटी व पी एम एफ एस प्रणालीद्वारे करण्यात यावी या शासन निर्णयान्वये वितरित केलेला निधी सन 2021-22 मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरता विनियोगात आणावा.

कृषी सिंचन योजनेची ध्येय

 • आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे.
 • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
 • जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
 • कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
 • कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.
 • समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.

ठिबक सिंचन (Drip irrigation) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी हे स्वतंत्र पोर्टल बनवले आहे यावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन साठी अर्ज करावा.

 

Leave a Reply