नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेत असतो, आज आपण असंच एका तांत्रिक शेती विषयी जाणून घेणार आहोत ती आहे पपई उत्पादन(Papaya Farming).
बाराही महिने फळ देणाऱ्या पपईची करा लागवड(Papaya Farming)
पपई(Papaya Farming) हे आर्थिक दृष्ट्या फार महत्वाचं एक फळपीक आहे. इतर कोणत्याही मुख्य पिकांपेक्षा हे जास्त प्रतीचे उत्पन्न देत. भारतामध्ये १५००० एकर जमीन या पिकाच्या लागवडी खाली आहे. त्यापासून जवळपास अंदाजे ७० लाख टन इतके उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रासारख्या उष्णकटिबंधीय राज्यांमध्ये पपई पिकाच्या लागवडी खालील १५००० हजार एकर जमीन असून त्यातून दरवर्षी ०६लाख टन उत्पादन घेतले जाते. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये पपई निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच पपईची निर्यात मूल्य ही सुमारे पाच पटींनी वाढले आहे. भारतामधून अनेक आखाती देशांना पपईची निर्यात होते.
भरपूर उत्पादन देणाऱ्या बऱ्याच पपईच्या जाती भारतात लागवडीकरता उपलब्ध आहेत. त्यापैकी तैवान या देशातील संकरित वाणांच्या पपईची झाडे(Papaya Farming) खताला फार उत्तम देतात. या तैवानी वाणाच्या पपई चा कालावधी किमान २० ते २२महिने असून किमान ११ ते १२ महिने फळे मिळतात. पपई उत्पादनासाठी आपणास फक्त दोन ते तीन वेळेस खतांची तांची मात्रा देणे आवश्यक असते, यामुळे पपई (Papaya Farming)पिकाला किती वेळेस रासायनिक खते किती वेळेस सेंद्रिय खते आणि पाणी कशा प्रकारे द्यावे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.
पपई पिकासाठी हवामान हे कोरडे, उष्ण असावे आणि पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते, ०२ डिग्री सेल्सिअसच्या खालची तापमान पहिला मानवत नाहीय. थंड हवामानात तयार झालेली फळे ही बरीच बेचव असतात.
पपई लागवडीसाठी कोणत्या जमिनीची निवड करावी
- पपई लागवड व लागवडीसाठी मोकळी आणि खूप भरपूर पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
- गाळाच्या जमिनीत व मध्यम काळ्या जमिनीत पपईची वाढ चांगली होते.
- पपईची वाढ चांगली होण्यासाठी भरपूर जैव पदार्थांचा साठा असणारी जमीन चांगली असते.खडकाळ, चुनखडी
- आणि मुरमाड जमिनीत पपई लागवड चांगल्या प्रकारे होत नाही.
- पाण्याचा निचरा योग्य न झाल्यास रोगामुळे खोड कुजू शकते.
- पपई लागवडीचा प्रमुख कालावधी
- पपई लागवड वर्षभरातून मुख्यत्वे जून ते जुलै, सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी या तिन्ही हंगामात होते महाराष्ट्रात लागवड मुख्यत्वे जून आणि ऑक्टोबर यादरम्यान होते.
पपई लागवडीसाठी खत व्यवस्थापन
- ज्या शेतामध्ये पपईची लागवड करायची आहे त्या शेतामध्ये आडवी-उभी नांगरणी करतांना प्रतिहेक्टरी 22 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत किंवा लेंडीखत मिसळावे.
- लागवडीनंतर प्रत्येक झाडास रासायनिक खत खालीलप्रमाणे द्यावे.
- लागवडीच्या वेळी : युरिया, DAP प्रत्येकी १०० gram आणि MoP ८० gram.
- लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात : युरिया DAP प्रत्येकी १०० gram आणि MoP ८० gram.
- वरील प्रमाणे रासायनिक खताची मात्रा ही लागवडीनंतर पाचव्या महिन्यात आणि लागवडीनंतरच्या सातव्या महिन्यातसुद्धा द्यावी.
पपई साठी पाणी व्यवस्थापन
- पपईला इतर कोणत्याही सिंचन पद्धतीने पाणी देणे, शिवाय ठिबक सिंचनाचा वापर अतिसुलभ ठरतो, कारण जास्त पाण्यामुळे पपईचे मुळे कुजू शकतात आणि लवकर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- उत्तम सिंचन व्यवस्थित बरोबरच पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी.
- गरजे इतकेच पाणी मिळाल्याने पपई ही निरोगी आणि जोमदार वाढते आणि यापासून उच्च प्रतीचे पीक मिळू शकते.
- पाण्याची मात्रा मोजण्यासाठी दर एक फूट अंतरावर ठिबक ई-मीटर बसवावेत जेणेकरून प्रत्येक झाडाला बारा लिटर पाणी मिळेल आणि पाण्याची व्यवस्था असल्यामुळे झाडे कुजणार नाहीत.
पपईची काढणी
- लागवडी च्या ९ ते १२ महिन्यांनी पपईची झाडे झाडांची वाढ पूर्ण होते आणि पपईची फळे काढणी योग्य होते.
- पपईच्या झाडाला वर्षभर फळे येत असतात त्यामुळे एकाच वेळेला सर्व फळांची काढणी करता येत नाही.
- झाडावरची पूर्णपणे पिकलेली आणि अर्धी पिकलेली फळे काढावी लागतात.
- फळांची तोडणी करताना फळे नेहमी देठासह तोडावीत अन्यथा साठवणुकीत आणि वाहतुकी दरम्यान पपई कुजण्याची शक्यता असते.
- पूर्ण तयार झालेले फळ काढल्यास फळाला उत्तम चव येते, लांबच्या बाजारपेठेसाठी पूर्ण वाढलेली फिक्कट हिरवी फळे काढावी म्हणजे वाहतुकीदरम्यान फळे पिकतात.
किती उत्पन्न मिळू शकतं
- पपईच्या एका झाडापासून वर्षाला ७० ते ८० फळे मिळतात आणि प्रत्येक फळाचे वजन साधारणतः ८०० ग्रॅम ते २.५ किलो दरम्यान असते.
- दरवर्षी सरासरी १२ ते १५ टन उत्पन्न एका एकरातून घेता येते.
- लागवडीसाठी उत्तम वाण, ठिबक सिंचनाची अचूक व्यवस्थापन आणि खतांचा योग्य वापर या सर्व बाबींचा विचार करून लागवड केल्यास हे उत्पन्न वाढवता येते.
पपईच्या पिकाला असणारे किडीची धोके
- पपईच्या पिकाला किडीपासून धोका असतो, यामध्ये कोळी, मावा, पांढरी माशी इत्यादी किडीमुळे पपईची पाने पिवळी पडून ठिपके पडतात आणि पाने झडू शकतात, तसेच ही कीड पानांतील रस शोषून घेते आणि पानावर चट्टे पडतात.
- किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी १० लिटर पाण्यात २५ml डायकोफॉल मिसळून फवारणी करावी.
- तसेच माव्याचा बंदोबस्त करण्यासाठी १० लिटर पाण्यात १५ मिली डायमेथोएट मिसळून फवारणी करावी.
- पपईच्या पिकाला किड व्यतिरिक्त वेगवेगळ्या रोगांची ही धोके असतात, यामध्ये करपा रोग, भुरी रोग, बुंदा सडणेआणि पपई व्हायरस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव संभवतो यामुळे उत्पादन क्षमता कमी होऊ शकते.
- रोगावर उपाय करण्यासाठी रोगाची लक्षणे लक्षणे दिसताच १० लिटर पाण्यामध्ये ३५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा १० ग्रॅम बाविस्तीन पावडर मिसळून झाडावर फवारणी करावी.
महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात असल्यामुळे यामध्ये कोणत्याही पिकाचे उत्पन्न हे भरघोस येत नाही. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाण्याची उपलब्धता बाराही महिने नसते त्यामुळे पपईच्या लागवडीतून आपण बाराही महिने उत्पन्न मिळवू शकतो. पपईचे पीक हे बाराही महिने फळ देत असल्याने आणि या फळांना बाहेरील बाजारात चांगली मागणी असल्याने शेतीपूरक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पपई उत्पादन फायदेशीर ठरते.
(papai sheti mahiti, papai lagwad,)