गव्हाच्या जाती variety of wheat

नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नेहमीच नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञान विषयी जाणून घेत असतो, आज आपण गव्हाच्या दोन नवीन सुधारित वाणा variety of wheat विषयी माहिती घेणार आहोत.

गव्हाच्या आल्यात नवीन २ जाती variety of wheat,

मिळणार कमी पाण्यात भरघोस उत्पन्न

गव्हाचे पीक हे भारतासारख्या शेतीप्रधान देशातील एक महत्त्वाचे पीक मानलं जात आणि पुष्कळ शेतकरी बारा महिन्यांमध्ये दोन वेळा गव्हाची लागवड करत असतात. गव्हाच्या लागवडीमध्ये गव्हाच्या जाती महत्त्वाची भूमिका बजावतात, गव्हाचं वाण हे सुधारित विकसित असेल तर पीक चांगल येत आणि भरघोस उत्पन्न मिळते.

भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांनी गव्हावर संशोधन करून गव्हाच्या दोन नवीन सुधारित जाती variety of wheat विकसित केल्या आहेत. या जातींची लागवड केल्यानंतर आपल्याला दर्जेदार उत्पन्न मिळू शकते.
गव्हाचा दोन वाणाच्या जाती लवकरच देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

गव्हाच्या दोन सुधारित वाण आहेत variety of wheat

पुसा प्रभात आणि पुसा वाकुला.

काय आहे पुसा प्रभात(HI-8823) वाणाची वैशिष्ट्ये ?

  • पुसा प्रभात हे गव्हाच एक सुधारित वाण आहे. गहू संशोधन केंद्र इंदूरचे शास्त्रज्ञ म्हणतात की ही कमी सिंचनाची जात आहे, याची उंची जास्त नसते म्हणून हे पीक तीन ते चार सिंचनानंतर तयार होऊ शकते.
  • हे गव्हाच सुधारित वाण हिवाळ्यातील लागवडीसाठी उपयुक्त आहे.
  • या गव्हा मध्ये झिंक, तांबे, विटामिन A, प्रथिने आणि आयर्न खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून हे गव्हाचं वाण फार उपयुक्त आहे.
  • पुसा प्रभात या जातीच्या वाणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते दुष्काळ आणि अति उष्णता सहन करू शकते, या पिकाचा परिपक्वता कालावधी १०५ ते १४० दिवसांचा आहे. हे वाण सिंचनाच्या जास्त अंतराने सुद्धा तयार करता येते.
  • पुसा प्रभात विकसित वाणापासून प्रतिहेक्‍टरी ४२ ते ४४ क्विंटल गव्हाचं उत्पन्न घेता येते, या विकसित जाती ची पेरणी केल्यानंतर यावर किड किंवा रोग पडण्याची शक्यता फार कमी असते, या वाणामध्ये गव्हाचा दाना हा मोठा, टपोरा तसेच त्याचा रंग तपकिरी पिवळा असतो.

काय आहेत पुसा वाकुला(HI-1636) वाणाची वैशिष्ट्ये ?

  • गव्हाच्या या जातीला पुसा प्रभात वाणापेक्षा जास्त पाणी लागते, म्हणजेच हिवाळा आल्यावरच या जातीची पेरणी करू शकतो, पुसा वाकूला जातीच्या पेरणीसाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा ते नोव्हेंबर चा शेवटचा आठवडा हा काळ योग्य आहे.
  • पुसा वाकुला वाणाला चार ते पाच वेळेस पाणी द्यावे लागते, हा गहू इतर कोणत्याही गव्हापेक्षा चपाती म्हणजेच पोळी साठी फार चांगला मानला जातो. या विकसित जातीमध्ये पोषणतत्व भरपूर प्रमाणात असतात. प्रोटिन्स, जस्त, तांबे आणि आयर्न यांचे प्रमाण भरपूर असते.
  • पुसा वाकुला ही गव्हाची जात १२० दिवसात पिकण्यास तयार होते. या वाणाच्या लागवडीतून हेक्‍टरी ६० ते ७० क्विंटल उत्पादन मिळू शकते. हे वाण परंपरागत वापरल्या जाणाऱ्या लोकवन आणि सोना या वाणांना पर्याय म्हणून लोकप्रिय आहे.

महाराष्ट्र सारख्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आढळते. त्यामुळे गव्हाचे चांगलं उत्पन्न घेण्यासाठी नवनवीन सुधारित वाणांची लागवड करणे अत्यावश्यक झाले आहे. वर नमूद केलेल्या जातींना पाणी फारच कमी लागते. आणि मार्केटमध्ये या गव्हाची चांगली मागणी लक्षात घेता महाराष्ट्रातल्या प्रगतीशील आणि उदयोन्मुख शेतकऱ्यांसाठी या गव्हाच्या वाणा विषयी माहिती घेऊन त्याची लागवड करणे क्रमप्राप्त झाले आहे.

वरील गव्हाच्या वाणाच्या variety of wheat खरेदीसाठी आपण भारतीय कृषी संशोधन संस्था इंदोर, मध्य प्रदेश यांच्याशी संपर्क साधू शकता.

Leave a Reply