नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी नवनवीन शेतीविषयक योजनेची माहिती घेऊन येत असतो.आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी जाणून घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे गोबर धन gobardhan योजना.
गोबर धन योजना gobardhan
चुलीपासून निघणाऱ्या धुरामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार भारतात दरवर्षी पाच लाखाहून अधिक महिलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत.
जसा आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही शेती आणि पशुपालन व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न कमी असतं आणि शेतकऱ्यांना गॅस ची सुविधा उपलब्ध करता येत नाही. महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो तसेच इतर कोणत्याही कामासाठी लाकूड आधारित चुलीचा वापर केला जातो या चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामीण भागात दीर्घकालीन आजाराला सामोरे जावं लागतं.
या योजनेच्या माध्यमातून भारतातील सर्व गावांचे एक सर्वेक्षण केलं जाईल आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामधून एका गावाची निवड केली जाईल या गावांमध्ये गोबर गॅस चा प्लांट लावला जाईल आणि या प्लांटची पूर्ण देखरेख ही सरकारद्वारे केली जाईल.
या गोबर गॅस यंत्राच्या माध्यमातून शेतातून निघालेला कचरा, घरगुती कचरा तसेच सेप्टिक टॅंक मधून निघणारा कचरा सर्व वापरून गॅस तयार केला जाईल आणि हा गॅस स्वयंपाक घरात वापरला जाईल.
गोबर धन gobardhan योजनेचे फायदे
- गोबरधन योजना सुरुवातीला 700 जिल्ह्यामधील एका गावामध्ये सुरू झाली आहे त्यानंतर हळूहळू या योजनेअंतर्गत सर्व गावांना सामील करून घेतले जाईल.
- गोबर गॅस वापरल्या जाणाऱ्या गॅस चा उपयोगाने हवा प्रदूषण घटण्यास मदत होणार आहे
- चुलीच्या वापरामुळे आणि लाकडातून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामीण भागातील महिलांना होणाऱ्या रोगराई पासून बचाव होणार आहे.
- ग्रामीण भागामध्ये शेतातून निघालेला कचरा वाया जातो या कचऱ्याच्या व्यवस्थापन करणे या संयंत्रामुळे अधिक सोपे होणार आहे.
गोबर धन gobardhan योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता
- लाभार्थी हा शेतकरी असावा.
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी शेतकरी ज्या गावांतर्गत अर्ज करणार आहे त्या गावाचा मूळ निवासी असावा शहरी भागातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र नाहीत.
- पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर.
कसा कराल गोबरधन gobardhan योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
- सगळ्यात आधी शेतकरी गोबरधन योजनेची अधिकारी वेबसाईट ओपन करा
http://www.sbm.gov.in. - नंतर आपल्यासमोर एक स्क्रीन दिसेल या स्क्रीन वरती असणाऱ्या रजिस्ट्रेशन या लिंक वर क्लिक करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल.
- या अर्जावर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती रहिवासी पत्ता ई-मेल आयडी गाव जिल्हा राज्य इत्यादी माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती जसे यूजर आयडी मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.
- मोबाईल क्रमांक दिल्यानंतर आपल्या ला एक ओटीपी मिळेल तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करावा लागेल त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
अशाप्रकारे आपलं गोबरधन योजनेसाठी रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
या योजनेच्या उपयुक्ततेमुळे आर्थिक आणि सामाजिक कायापट झाल्यामुळे स्वच्छ भारत मिशन योजनेला बळ मिळणार आहे.