करा आल्याची शेती (Ginger Farming), मिळेल भरघोस उत्त्पन्न

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन शेतीविषयक माहिती आणि योजनांविषयी जाणून घेत असतात, आज आपण असाच एका शेतीपूरक व्यवसायासंबंधीत आलेची शेती Ginger Farming विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेतकरी बंधूंना शेती पिकांमध्ये आलेची शेतीतून अधिक उत्पन्न मिळून देईल. त्याकरिता आमचा निरागस प्रयन्त.

पश्चिम भारतातील महाराष्ट्र हे राज्य उबदार व दमट हवामानामुळे आल्याच्या लागवडीसाठी सर्वोत्त्कृष्ट आहे. तसेच इतर काही राज्यांमध्ये देखील आल्याचे Ginger Farming पीक म्हणून घेतले जाते आहे.

आले ही एक बारमाही औषधी वनस्पती आहे. जी आपल्या रोजच्या स्वयंपाक आणि पारंपारिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

आल्याचे उपयोग (Benefits of Ginger)

१) दाहक-विरोधी गुणधर्म: आल्यामध्ये अशी संयुगे असतात ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरात जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत
करतात.

२) मळमळ आणि उलट्या दूर करण्यासाठी आले खूप प्रभावी असल्याचे आढळले आहे.

३) आले पाचक एंजाइमचे उत्पादन वाढवून आणि सूज येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करून पचन सुधारण्यास मदत करू शकते.

४) आल्यामध्ये वेदना कमी करणारे नैसर्गिक गुणधर्म आहेत. स्नायूदुखणे, अंग दुखणे तसेच मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यात आले हा प्रभावी ठरू शकते.

५) आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स चे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगापासून संरक्षण करण्यास मदत करते.

६) काही संशोधनानुसार असे दिसून आले कि, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी आल्याचं सेवन फायदेशीर ठरते.

७) आले हे आपल्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.

८) आल्यामध्ये नवीन संशोधनानुसार कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले आहेत, आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत आले करू शकते.

♣ आलेची शेती Ginger Farming कश्याप्रकारे करू शकतो ♣

हवामान :

  • अद्रकची शेती ginger Farming करण्यासाठी हवामान योग्य असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये उष्ण व कोरडा उन्हाळा व सौम्य हिवाळा असलेले उष्णकटिबंधीय हवामान आहे.
  • आल्याची चांगली वाढ होण्यासाठी उबदार आणि दमट वातावरणाची भरपूर आवश्यकता असते.
  • जून ते सप्टेंबर पर्यंत टिकणाऱ्या पावसाळ्यात आल्याची लागवड करण्याचा सल्ला दिला शेतकरी बंधूंना दिला जातो. यामुळे पिकाला वाढीच्या सुरुवातीच्या काळात पुरेसा ओलावा मिळतो.

तापमान:

  • आले 25 डिग्री सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सियस (77 डिग्री फॅ ते 95 डिग्री फॅ) दरम्यान च्या तापमानात चांगल्या प्रमाणात वाढते. आल्याच्या वाढीसाठी आदर्श तापमान श्रेणी 27 डिग्री सेल्सियस ते 32 डिग्री सेल्सियस (81 डिग्री फॅ ते 90 डिग्री फॅ) दरम्यान असते.
  • 20 डिग्री सेल्सियस (68 डिग्री फॅ) पेक्षा कमी आणि 35 डिग्री सेल्सियस (95 डिग्री फॅ) पेक्षा जास्त तापमान पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम करू शकते.

आर्द्रता:

  • आल्याची चांगली वाढ होण्यासाठी उच्च आर्द्रतेचे प्रमाण आवश्यक आहे. आल्याच्या वाढीसाठी सापेक्ष आर्द्रता पातळी 70% ते 80% आदर्श आहे.
  • जर कमी आर्द्रतेची पातळी असेल तर कमी आद्रतेच्या पातळीमुळे पाने मुरडतात आणि आल्याची वाढ देखील कमी होते.
  • महाराष्ट्रात वालुकामय दमट जमिनीपासून ते जड मातीच्या मातीपर्यंत विविध प्रकारचे मातीचे प्रकार आहेत.
  • सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या चांगल्या निचरा झालेल्या जमिनीत आले उत्तम प्रकारे वाढते. जमिनीचा पीएच आणि पोषक पातळी निश्चित करण्यासाठी लागवडीपूर्वी माती परीक्षण होणे गरजेचे आहे, आणि इष्टतम वाढीची परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सुधारणा करणे महत्वाचे आहे.

आल्याच्या Ginger Farming जातीच्या प्रकार (Types of Ginger)

१) रिजया (Rijiya)

  • रिजया या जातीची निवड केल्यास या प्रकारचे आले लागवडीपासून कमीत कमी दोनशे ते दोनशे वीस दिवसांमध्ये काढणीस तयार होतो.
  • आल्या मध्ये धाग्याचे प्रमाण 4 टक्के असून उत्पादन न प्रति हेक्‍टरी २४.५ टन उत्पन्न मिळते.

२) महिमा (Mahim)

  • महिमा या जातीची निवड केल्यास या प्रकारचे आले लागवडीपासून कमीत कमी दोनशे दिवसांमध्ये तयार होणार आहे.
  • या आल्या मध्ये पण त्याचे प्रमाण पायाच असल्यास ४.२६ टक्के असून या वाणाच्या सुट्टी चा उतारा हा सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. हे आले आपल्याला प्रति हेक्‍टरी उत्पादन २४.३ टन प्रतिहेक्‍टर उत्त्पन्न मिळते.

३) वरदा (Varda)

  • वरदा या जातीची लागवड केल्यास हा आपल्याला २१० ते २१५ दिवसा मध्ये काढणीस तयार होते. या वाहनांमध्ये तंतूचे प्रमाण ३.९ ते ४.५ टक्के इतके असतो.
  • तसेच हे आले मध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे. तर या आल्यापासून उत्पादन आपल्याला २३.५ टन प्रति हेक्‍टरी मिळते या आल्यापासून होणारा सुट्टीचा उतारा २३ टक्के इतका आहे.

४) माहिम (Maahim)

  • माहिम या जातीची लागवड केली असल्यास या जातीची लागवडी पासून आपल्याला २०५ ते २१५ दिवसांमध्ये काढणीस तयार होतो.
  • या वाणापासून उत्पादन २१ ते २२ टनापर्यंत प्रति हेक्‍टरी मिळते. या वाणापासून तयार होणाऱ्या सुट्टीचा उतारा म्हणजे १९.२ टक्के इतका मिळतो.

आले Ginger Farming लागवडीसाठी पूर्वमशागत

१) आल्याची लागवड करण्या अगोदर, पूर्वमशागत उत्तम प्रकारे करणे अत्यन्त गरजेचे आहे. शेतीची मशागत करतांनी उभी व आडवी खोल नांगरट करून घ्यावी.

२) त्यानंतर नांगरटी करून १८ ते २० दिवस जमीन तपणी पडू द्यावी. त्यानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेले ढेकळे फोडून घ्यावे. त्याकरिता आपण वखराच्या किंवा रोटाव्हेटर चा वापर करू शकता.

३) ३५ ते ४० गाड्या शेणखत चांगले कुजलेले वापरावे आल्याची लागवड सपाट वाक्यावर व रुंद वरंबा पद्धत किंवा सरी         पद्धतीने करावी. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी.  जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल. वाफे पद्धतीने २x १ मीटर किंवा १. ५ x ३ मिटर आकाराचा वाफ्यावर लागवड करावी.

४) आपण ठिबक सिंचनाच्या द्वारे बेडवर किंवा पाठ सरीच्या पाण्याच्या साह्याने आपण आल्याची लागवड करू शकतो.

५) आपण आल्याची लागवड (Ginger Farm) करत करत असतांना आल्याची चांगल्या प्रकारे निवड करणे अत्यंत गरजेचे असते. आल्याची लागवड करत असताना फुगलेल्या डोळ्यांचे मोठा पासून करत असताना अंदाजे त्या आल्याचे वजन २७ ते ३० ग्रॅम वजनाचे असावे. त्या आल्याच्या २ ते ३ डोळे असावे रोख किंवा बुरशीनाशक नसावें.

पाणी व खते (Water and Fertilizer) – Ginger Farming

१) कंपोस्ट खत हा जमिनीसाठी सेंद्रिय पदार्थ व पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे.

२) स्वयंपाकघरातील कचरा, अंगणातील कचरा आणि पाने यासारख्या सेंद्रिय कचरा गोळा करून आणि कालांतराने त्याचे विघटन होऊ देऊन आपण आपले स्वतःचे कंपोस्ट तयार करू शकता.

३) जनावरांचे खत हे पोषक व सेंद्रिय पदार्थांचा चांगला स्रोत आहे. माती सुधारण्यासाठी आपण गाय, घोडा, कोंबडी किंवा मेंढ्यांचे खत वापरू शकता. खत वापरण्यापूर्वी कमीतकमी 3-6 महिने वयाची खात्री करा, कारण ताजे खत वनस्पतींची मुळे जळू शकते. क्लोव्हर, शेंगदाणे व गवत यांसारखी आच्छादन पिके जमिनीची सुपीकता व रचना सुधारण्यास मदत करतात. ते क्षरण रोखण्यास आणि तण दडपण्यास देखील मदत करतात.

४) झाडांची पडलेली पाने हा सेंद्रिय खताचा एक उत्तम स्त्रोत आहे.  ज्याचा उपयोग जमीन सुधारण्यासाठी उत्तमरीत्या केला जाऊ शकतो.

५) जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळण्यासाठी कंपोस्ट, खते किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचा थर जमिनीवर पसरवून तो सुमारे ८-१० इंच खोलीपर्यंत पसरवावा. यामुळे जमिनीची सुपीकता, पाणी टिकून राहणे आणि पाण्याचा निचरा होण्यास अधिक मदत होईल आणि आल्याच्या रोपांना निरोगी वाढीचे वातावरण मिळेल. जेणेकरून आल्याचा उत्पन्नात अधिक भर होईल.

६)  पूर्वमशागतीच्या वेळी आपल्या शेतामध्ये शंकर वापरण्याची गरज नाही. कारण आपण पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीमध्ये शेंखात मिसळलेले असते तर लागवड पूर्वी कमीत कमी एक तर 75 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या रासायनिक खतांच्या वापर अवश्य करावा.

आले या पिकाला पाणी खूप महत्वाचे आहे,  त्याकरीता आले पीक रोग पुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावा व नत्राचे आपण दोन याच्यात विभाजन करून पहिला ३८ ते ४२ दिवसांनी व दुसरा डोस हा १०८ ते ११८ दिवसांनी द्यावे.

खताचे नियोजन केल्यास आपल्याला उत्पन्नात निश्चित वाढ झालेली दिसेल. तसेच पाण्याचे नियोजन हे आपल्याला जमिनीतील ओलावा पाहून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. आले पिकाला पाण्याची जास्त गरज असते जेवढे मुबलक पाणी तेवढे उत्पन्न जास्त होते.

शेतकरी बंधूंनो, आम्ही आशा करतो आपणांस आल्याची शेतीविषयी (Ginger Farming) माहिती आवडली असेल, अश्याच नवनवीन शेती विषयक माहितीकरिता आपल्या हक्काच्या संकेतस्थाळावर जाऊन आपल्या ज्ञानात भर करावी.

वरील लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद…! तसेच आपणांस विनंती आहे कि कृपया वरील लेख शेअर करावी जेणेकरून इतर शेतकरी बंधूंनादेखील आल्याची शेतीची माहिती मिळेल.

Leave a Reply