गरोदरपणात मिळणार सरकारी मदत : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना pmmvy

|| गरोदरपणात मिळणार सरकारी मदत : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (pmmvy) ||

नमस्कार बंधु आणि भगिनींनो, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन सरकारी योजनेची माहिती घेऊन येत असतो. आज आपण अशीच एक सरकारी योजना विषयी माहीती घेणार आहोत. ती योजना म्हणजे पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (pmmvy).

पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजना ही एक केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेली योजना आहे. पंतप्रधान मातृत्व वंदना योजना ही दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केली आहे.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजना हि योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय / समाज कल्याण विभागाअंतर्गत चालवली जाते.

हि योजने अंतर्गत लाभार्थी गर्भवती महिलांना सरकार कडून रुपये ५०००/- मिळतात. जे टप्प्याटप्प्याने (हप्त्या) लाभार्थी महिलांना मिळतात. तसेच जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र गर्भवती महिलांना रुपये १०००/- अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण रुपये ६०००/- लाभार्थी गर्भवती महिलांना सरकार कडून दिले जातात.

पंतप्रधान मातृ वंदना (pmmvy) योजनेचा मुळ उद्धिष्ट

अनेक गर्भवती महिलांना अधिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी, उदरनिर्वाहनासाठी नाईलाजाने त्यांना गरोदरपणाच्या शेवटच्या दिवासातही काम करावे लागते. परिणामी महिलांवर कुपोषणाचा परिणाम आढळून येत आहे. कुपोषणासोबतच अश्यक्तपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कुपोषण असणाऱ्या महिला कमी वजनाच्या बाळांना जन्म देत आहेत.

अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर वेळेअभावी त्यांना कामाला लवकर सुरवात करावी लागते. परंतु त्यांचे शरीर कामासाठी सक्षम झालेले नसते.
अशा परिस्थितीत महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी. त्यामुळे माता व तिच्या बालकाचे आरोग्यमान सुधारण्यासाठी त्यांना सकस आहार मिळावा यादृष्टीने सरकारने पंतप्रधान मातृत्व वंदना योजना नावाची एक उपयोगी योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत गरोदर महिलांना रुपये ६०००/- यांची मदत दिली जाते.
माता व नवजात बालक मृत्यु दरात घट होऊन ती नियंत्रित राहावी, या हेतूने केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने पंतप्रधान मातृत्व वंदना संपूर्ण देशात लागू केली आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 21 नोव्हेंबर 2017 च्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मातृत्व वंदना योजना लागू करण्यासाठी मान्यता दिली होती.

योजनेची रक्कम कश्याप्रकारे प्राप्त होते..

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना रुपये ५०००/- दिले जातात. तसेच जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र गर्भवती महिलांना रुपये १०००/- अतिरिक्त रक्कम महिलेला दिले जातात, असे एकूण रुपये ६०००/- रक्कम दिले जाते.

पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (pmmvy) अंतर्गत दिले जाणारे हप्ते खालीलप्रमाणे आहेत.

१) पहिला हप्ता – अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा केंद्र वर गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर रुपये १०००/- आर्थिक मदत दिली जाते.
२) दुसरा हप्ता – गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, रुपये २०००/- दुसरा हप्ता दिला जातो.
३) तिसरा हप्ता – तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी रुपये २०००/-* दिला जातो.

लक्ष: ‘*‘ जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र गर्भवती महिलांना रुपये १०००/- अतिरिक्त रक्कम तिसऱ्या हप्त्यामध्ये दिली जाते.

पंतप्रधान मातृ वंदना (pmmvy) योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

१) पंतप्रधान मातृ वंदना यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.

२) केंद्र शासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचा निकष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त राज्य आरोग्य सेवा अधिकारी, तसेच अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त मुंबई यांच्यामार्फत पंतप्रधान मातृ योजना लागू केली जाते, तसेच यासाठी राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी सुद्धा नेमला जातो.

३) राज्यात 1 जानेवारी 2017 नंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र असतील. ही योजना एक वेळा आर्थिक लाभाची असून पहिल्या अपत्यापुरतीच मर्यादित आहे, या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.

४) आरोग्य विषयक कारणांमुळे नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच पुरताच लाभ मिळेल.

५) या योजनेत दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरीही वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या या नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

६) प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (pmmvy) अंतर्गत सर्व प्रकारच्या गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.

७) या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.

८) लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.

९) लाभार्थी आणि त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

१०) अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क कोणाशी कराल :

१) पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने ग्रामीण क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्र यांसाठी वेगवेगळे कार्यक्षेत्र नेमले आहे.

२) ग्रामीण क्षेत्र या योजनेच्या पात्र लाभार्थींना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र-१अ अर्ज देऊन त्यानंतर तो अर्ज लिखित नमुना आणि आवश्यक कागदपत्रासह प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका समन्वयक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल. हा अर्ज कोणत्याही त्रुटी शिवाय भरण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तालुका समन्वयक अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती तपासली जाईल, आणि राज्यस्तरावरून संगणक प्रणालीद्वारे या योजनेचा थेट लाभ लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात येईल.

३) नगरपालिका क्षेत्र पात्र लाभार्थींना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र-१अ अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारला जाईल, हा अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकार्‍याकडे पाठवण्यात येईल. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जांची माहिती अचूकपणे भरतील.

४) महानगरपालिका क्षेत्र मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लाभार्थी महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र-१अ हा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारला जाईल, आणि त्यानंतर हा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय समन्वयक अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.

पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

१) लाभार्थ्याने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.

२) मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

३) बँक खाते तपशील.

४) MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड).

५) लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र).

६) दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत देणे अनिवार्य आहे.

७) तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून अपत्याचा जन्म नोंदणीची एक प्रत आणि बाळाचे लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.

पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजनेचा फॉर्म प्राप्त कश्याप्रकारे कराल.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळवावा लागेल. तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in वर जाऊन डाउनलोड करू शकता. किंवा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन फॉर्म मिळवु शकतात.

खालीलप्रमाणे आपण Online फॉर्म मिळवू शकता.

१) सर्वप्रथम तुम्हाला या https://wcd.nic.in या केंद्र सरकारच्या अधिकृत लिंकवर जावे.

२) तुम्ही महिला आणि बाल विकास ( Ministry Of Women and Child Development) विभागाच्या अधिकृत वेबसाइटचे मुख्य पेज दिसेल.

३) येथे pmmvy फॉर्म 1A, pmmvy फॉर्म 1B आणि pmmvy फॉर्म 1C हे तीन फॉर्म डाउनलोड करावे.

४) फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी. तुमची आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी. व आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी.

५) जमा केलेल्या (अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र) तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवावी.

पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजने अंतर्गत जमा झालेली रक्कम तुम्ही दिलेल्या बँक खात्यात दिसेल.

नमस्कार बंधु आणि भगिनींनो, आम्ही आशा करतो कि आपणांस पंतप्रधान मातृत्व वंदना (pmmvy) योजने माहिती नक्कीच आवडली असेल, अश्याच नवनवीन सरकारी योजनेविषयी व शेती विषयक माहितीकरिता आपल्या हक्काच्या https://krushi18.com संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

वरील लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद…!

तसेच आपणांस विनंती आहे कि, कृपया वरील लेख शेअर करावी, जेणेकरून इतर बंधु आणि भगिनीं देखील या योजेनची माहिती मिळेल व लाभ घेता येईल.

 

Maharashtra agriculture शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा शेतकरी पदयात्रा !!

Leave a Reply