नमस्कार शेतकरी बंधूंनो , आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन शेतीविषयक माहिती आणि योजनांविषयी जाणून घेत असतात, आज आपण असाच एका शेतीपूरक व्यवसायासंबंधीत खरबूज शेती (Muskmelon Farming) विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेतकरी बंधूंना शेती पिकांमध्ये खरबूज शेतीतून (Muskmelon Farming) अधिक उत्पन्न मिळवून देईल. त्याकरिता आमचा निरागस प्रयन्त.
खरबूज शेती (Muskmelon Farming)
खरबूज ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे याची पान आणि फुल हे पिवळे असतात. खरबूज हे टरबूज जातीच्या संबंधितील एक फळ आहे. खरबूज हे फायबर व्हिटॅमिन आणि पोषण तत्वांनी भरपूर असं पोषक फळ आहे.
खरबुजाच्या अनेक जाती विकसित आहेत, यापैकी काही हिरव्या पांढऱ्या नारंगी जाड सालीच्या गोल व अंडाकृती किंवा काकडीच्या आकाराच्या अशा अनेक जाती प्रसिद्ध आहेत.
खरबूज हे उन्हाळ्याच्या हंगामात पिकवलं जाणार एक वार्षिक दर्जाचं फळ आहे. खरबूज जवळजवळ सर्व उष्णकटिबंधीय भागात येतं. चीन हा देश खरबूज या फळाचा सर्वात मोठा उत्पादन करणारा देश आहे.
तसेच तुर्कमेनिस्तान आणि भूमध्य सागराच्या जवळपासचे क्षेत्रही खरबुजाचं प्रमुख उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
खरबूज उत्पादक क्षेत्र हे मधुमक्षिका पालनासाठी ही अनुकूल असं क्षेत्र म्हणून ओळखले जातात. कारण खरबूज च्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात मध निर्माण करण्यासाठी लागणारे गुणधर्म असतात.
खरबूज पिक पूर्ण लागवडीसाठी लागवड केल्यानंतर १०० ते १३० दिवसापर्यंतचा वेळ लागतो. जवळजवळ 78 ते 90 दिवसानंतर एक झाड फळे द्यायला सुरुवात करतात.
खरबूज फळाचे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज सेवन केल्याने आपण आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा भरपूर प्रमाणात वाढवू शकतो. तसेच गर्मीमुळे शरीरात झालेली पाण्याची कमतरता तसेच इतर समस्या दूर करण्यात खरबूज अत्यंत लाभदायक आहे.
१) खरबूज एक लाभकारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील आहे. यामध्ये शरीराला ताकद देणारे कॅल्शियम लोह विटामिन ए आणि विटामिन सी यांची अधिक मात्रा आढळते. खरबुजाच्या सेवनाने मूत्रविकारासंबंधी दोष दूर होण्यास मदत होते.
२) खरबुजाचे सेवन केल्याने त्वचा रोग एक्झिमा ही दूर करता येतो.
३) खरबुजा मध्ये कॅलरी फार कमी असल्याने वजन वाढीच्या समस्याने ग्रासलेल्या लोकांसाठी हे एक लाभदायक फळ आहे.
४) खरबुजाच्या बियांमध्ये 40 ते 50 टक्के तेल असते. हे तेल बऱ्याच गोष्टींमध्ये वापरले जातात.
५) खरबुजाच्या बिया तुपामध्ये भाजून साखरेच्या पाकात टाकून खाल्ल्याने डोकेदुखीवर आराम मिळतो. तसेच आपण यामध्ये मावा टाकून लाडू सुद्धा बनवू शकतो.
६) खरबुजाच्या बियांचा काढा बनवून त्याने गुळण्या केल्याने गळ्याच्या तसेच घशाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो.
७) खरबुजाची बिया तसेच फळाचे साल इत्यादी वाळवून व कुठून चेहऱ्यावर लावल्याने डाग मुरूम चामखीळ आदींना कमी करण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर चमक येते.
८) दोन ग्रॅम खरबुजाच्या बिया कुठून, त्यामध्ये अर्धा ग्राम मिरे पाच ग्रॅम खडीसाखर इत्यादी मिसळून त्याचा काढा करून पिल्याने छातीची जळजळ कमी होते.
खरबुजाच्या बिया वाटून कोमट पाण्यामध्ये भिजवून त्याचा लेप लहान मुलाच्या पोटावर लावल्याने लहान मुलाचे पोटाचे आजार दूर होतात.
९) मूत्रमार्गासंबंधीत विकारांवर खरबूज लाभकारी आहे खरबुजाच्या बिया वाटून दुधात मिसळून पिल्याने मूत्रमार्गाचा दाह कमी होतो.
१०) खरबुजाच्या बिया वाटून पाण्यामध्ये मिसळून पिल्याने किडनी विकारासंबंधी दोष दूर करता येतात. तसेच किडनीतील खडे लवकर विरघळतात.
आपण पाहूया खरबूज ची लागवड (Muskmelon Farming) कशी करतात.
१) खरबूज या पिकाची लागवड मुख्यत्वे करून जानेवारी महिन्याच्या अखेरी सुरू होते.
२) खरबूज पिकाची लागवड ही बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन फेब्रुवारी च्या मध्यपर्यंत करावी.
३) खरबुजा साठी जमीन निवडताना खोल पाण्याचा निचरा होणारी गाळाची जे ताट जमीन वापरावी.
४) खरबुजाच्या पिकासाठी काळी जमीन उपयोगिता ठरू शकते, पण त्यासाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय खत आणि पाण्याच्या निचरा करण्याची सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे.
५) रेताड मध्यम वाळूमिश्रित खडकाळ जमीन खरबुजा साठी चांगली असते.
६) खरबूज लागवडीसाठी जमीन सर्वप्रथम नांगरून कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर त्यावर रोटावेटर फिरवून घ्यावा.
७) पाठ पाडून त्यामध्ये अडीच किलो पर्यंत चांगले सेंद्रिय खत व दहा ग्रॅम इतर कोणतेही खत मिसळून पाठ भरून घ्यावा.
८) खरबूज लागवडीसाठी गादीवाफे तयार करून, कडेला दीड ते अडीच मीटर रुंद अंतराने बियाची पेरणी करावी किंवा दुसरी पद्धत म्हणजे दीड ते अडीच मीटर दोन ओळीत अंतर ठेवून 50 सेंटीमीटर पर्यंत व्यासाचे वर्तुळाकार खड्डे करून पेरणी करावी.
९) एक हेक्टर खरबुजाच्या लागवडीसाठी दोन किलो बियाणे पुरेसा आहे. बियाणांच्या प्रतिकूलप्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. जोमदार रोपांची निवड केल्याने पीक निश्चितीच चांगले व अधिक येते.
१०) खरबुजाची लागवड करण्यासाठी आपण आळे पद्धत, सरी पद्धत किंवा रुंद गादीवाफेची पद्धत इत्यादी पद्धती ही वापरून लागवड शकता.
खते आणि पाणी व्यवस्थापन
खरबुजाच्या पिकासाठी लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर एक महिन्यांनी 50 किलो नत्र हप्त्याने द्यावे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी वाढवत न्यावे.
वेलीच्या वाढदिवसाच्या मुख्य कार्यकाळात सात दिवसाच्या अंतराने व फळधारणा होऊन फळबागडू वाढू लागल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. उन्हाळ्यात पाणी देण्याच्या पाळ्या वाढवाव्यात. वेलीची वाढ सुरू झाल्यानंतर आजूबाजूची तन मोकळे करावे.
खरबुजाची काढणी आणि उत्पादन
खरबूज पूर्ण पिकल्यानंतर याची काढणी केली जाते. नदीच्या पाण्यावर पिकवली जाणारी फळे इतर बागायती शेतीच्या फळांपेक्षा लवकर पिकू तयार होतात. साधारणतः बी पेरल्यापासून साडेतीन महिन्यानंतर काढणी सुरू होते. काढणी तिथून पुढे चार आठवड्याच्या पूर्वी पूर्ण करता येते. फळ पाहून त्याची परिपक्कवता ठरवणे हे फार जिकरीचे व जोखमीचे काम आहे.
त्याकरिता फळ काढणे योग्य आहे की नाही हे ठरवण्याच्या काही पद्धती आहेत.
१) खरबूज देठाजवळ जर शुक्ल तर ते तयार झालेले आहे, असं समजता येतात.
२) फळ हे हाताने बडवून पाहिल्यास बदबद असा आवाज येतो.
३) तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर्रर्रर्र आवाज येतो.
४) फळ तयार झालेले असल्यास देठ ताठठरलं जातं आणि त्यावर बारीक बारीक लव दिसत नाही.
खरबुज फळाचा बाजार भाव
महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये सामान्यतः खरबूज पिकाला तेराशे रुपये प्रतिक्विंटल ते कमीत कमी बाराशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळू शकतो.
खरबूज पिकाच्या उत्पादनामध्ये सातत्य नसल्याने बाजारात होणारी आवक ही कमी जास्त असते. यामुळे उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये खरबुजाच्या भावांमध्ये चढ-उतार पाण्यात मिळतो.
ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातील फळ मार्केटमध्ये खरबूज पिकाला सातत्यपूर्ण मागणी असते. परंतु उत्पादन क्षेत्रापासून शहरी मार्केट पर्यंत फळ पोहोचण्या साठी लागणाऱ्या खर्चामुळे विक्री खर्चामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत.