कोबी आणि फुलकोबीची शेती Cabbage and Cauliflower farming

Cabbage and Cauliflower farming नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण नवनवीन शेतीविषयक माहिती व सरकारी योजनेविषयी जाणून घेत असतो. आज आपण अशाच एका फायद्याच्या शेतीपूरक व्यवसायाच्या संबंधित माहिती जाणून घेणार आहोत. तो म्हणजे कोबी आणि फुलकोबी ची शेती (Cabbage and Cauliflower farming). 

महाराष्ट्रातील शेतकरी हा बऱ्याच काळापासून पारंपारिक पिकांबरोबर फळभाज्या आणि फुल भाज्यांचे पीकही घेत आला आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये कोबी आणि फुलकोबीची (Cabbage and Cauliflower farming) लागवड केली जाते.

कोबी पिकाखाली अंदाजीत  7200 हेक्टर क्षेत्र आहे. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजीत 7500 हेक्टर क्षेत्र आहे. कोबी ही भाजी आहारातील एक प्रमुख भाजी असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर या भाजीला चांगली मागणी असते.

कोबीमध्ये सोडियम, लोह आणि खनिज द्रव्यांसोबत, विटामिन ए आणि विटामिन बी यांचे प्रमाण मुबलक असते.

कोबीच्या पिकाला थंड हवामानाची गरज असते. सर्वसाधारणपणे 20 पेक्षा कमी सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फुलकोबी लागवड करताना शक्यतो तापमानाची विशेष दखल घ्यावी लागते.

 1. रेताळ आणि मध्यम पाणी निचऱ्याची जमीन तसेच खडकाळ जमीन ही कोबीच्या लागवडीसाठी योग्य असते.
 2. कोबीची लागवड ही वाफे तयार करून केली जाते.
 3. कोबी हे पीक सपाट वाफेवर सुद्धा चांगल्या प्रकारे येते.
 4. कोबीच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे झालेली हवी नांगरट करून त्यानंतर जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
 5. त्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय खत आवर्जून मिसळावेत.
 6. पेरणीपूर्वी बी पाण्यामध्ये भिजवून अर्धा तास स्ट्रीपटोसायक्लिन च्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. आणि त्यानंतर दोन तास सावलीमध्ये सुकवून घ्यावे.
 7. कोबीची लागवड ही वाफ्यावर करताना वाफ्याची रुंदी 15 सेंटीमीटर समान असावी.
 8. लागवड झाल्यानंतर याची उगवण होईपर्यंत थोडं थोडं पाणी झारीने (मघ, जग) द्यावे.  बी पेरल्यापासून पाच आठवड्या पर्यंत रोपे लागवडीस तयार होतात.
 9. कोबी पिकाला लागवडी पूर्व ८०-८० किलोच्या मात्रेत खत द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
 10. कोबीची गड्डे दिसू लागल्यापासून गड्डे पूर्ण वायाळ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे.

खते

 1. कोबी वर्गीय भाज्यांना मावा रोगाचा फार धोका असतो. तसेच घाण्या आणि रोग कोलमडणे चा धोका सुद्धा संभवतो. यासाठी कीटकनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या 12 ते 15 दिवसाच्या अंतराने करावे.
 2. कोबीचे पीक हे अडीच ते तीन महिन्यात पूर्णपणे तयार होते. तयार झालेले गट्टे हे हाताला जड लागू लागतात. गडात जास्त काळ तसाच ठेवला त्यामध्ये पाणी साचते किंवा गड्डे पिवळसर पडतात, यामुळे योग्य वेळी काढणी करावी.

व्यवस्थित तांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास आणि आंतरमशागती वर भर देऊन पिकाची व्यवस्थित निघालास कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फुलगोबीचे 100 ते 250 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेता येते.

गेल्या काही महिन्यापासून पडणारा अवकाळी पाऊस मार्केटमध्ये पारंपारिक पिकांना उपलब्ध नसलेला बाजार भाव यामुळे आता आधुनिक काळात शेतकरी बंधू फळभाज्याच्या उत्पादनाकडे वळला आहे.

कमी मेहनतीमध्ये आणि कमी संसाधनांची उपयोग करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी फळभाज्यांची शेती एक चांगला व्यवसाय हा वरदानच ठरतो आहे.

शेतकरी बंधूंनो, आम्ही आशा करतो आपणांस कोबी आणि फुलकोबीची (Cabbage and Cauliflower) शेती माहिती नक्कीच आवडली असेल, अश्याच नवनवीन शेती विषयक माहितीकरिता आपल्या हक्काच्या संकेतस्थाळावर जाऊन आपल्या ज्ञानात भर करावी.

वरील लेख वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद…!

तसेच आपणांस विनंती आहे कि कृपया वरील लेख शेअर करावी जेणेकरून इतर शेतकरी बंधूंनादेखील कोबी आणि फुलकोबीची (Cabbage and Cauliflower) विषयी माहिती मिळेल.

गव्हाची आवक वाढली, भाव घसरण्याची शक्यता !!

1 thought on “कोबी आणि फुलकोबीची शेती Cabbage and Cauliflower farming”

Leave a Reply