Red Onion varietiesRed Onion varieties
नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन शेती विषयी माहिती जाणून घेत असतो आज आपण कांद्याच्या जाती Onion varieties विषयी अधिक माहिती घेणार आहोत.
दरवर्षी खरीप कांदा पिकाचे सदोष बियाणे, सततचा पाऊस, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव इत्यादींमुळे नुकसान होत असते. यामुळे जेव्हा शेतकरी कांद्याची लागवड करतो त्या वेळेला योग्य वाणांची निवड एक महत्वपूर्ण गोष्ट ठरते.
हंगामानुसार आहे वेगवेगळं कांद्याचे बियाणं, करा लागवड सुधारित कांद्याच्या वाणांची Red Onion varieties
भारतामध्ये कांद्याचे उत्पादन हे रब्बी आणि खरीप हंगामात सुद्धा घेतली जाते, भारतात कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी पुष्कळसे उत्पादन हे खरीप कांद्यापासून मिळते.
महाराष्ट्रासारख्या उष्णकटिबंधीय राज्यांमध्ये प्रामुख्याने खरीप कांद्याचे उत्पादन जास्त घेतले जाते, कांद्याची लागवड ही जून, जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत केली जाते आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये काढणी केली जाते.
कांदा लागवडीसाठी बियाणे Red Onion varieties निवडताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत
- कांद्याचा वाण निवडताना उपयोग आणि कीड रोगप्रतिकारक क्षमता, कांद्याच्या पातीची जाडी रंग, इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.
- लागवडीसाठी बियाणे खरेदी करताना शुद्ध, स्वच्छ शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, चालू वर्षाचे आणि भेसळ मुक्त बियाणं खरेदी करावं
- बियाणं खरेदी ही नेहमी चांगल्या आणि विश्वासू मार्केट मधूनच करावी, जसे की कृषी संशोधन विद्यापीठे आणि फलोत्पादन संशोधन केंद्र.
- खाजगी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी आणि ते बियाणं फलोत्पादन संशोधन केंद्राकडून प्रमाणित करून मगच खरेदी करावं.